सोलापूर : विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यात 489 जणांना कर्ज
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या वतीने केंद्र शासन विश्वकर्मा या महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शहर जिल्ह्यातील बँकांना
सोलापूर : विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यात 489 जणांना कर्ज


सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या वतीने केंद्र शासन विश्वकर्मा या महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शहर जिल्ह्यातील बँकांना 548 प्रस्ताव दिले होते. मात्र, प्रत्यक्षात 489 प्रस्तावकांचे प्रकरण मंजूर केले आहेत. या प्रस्तावकांना पारंपरिक उद्योगांना पाठबळ मिळाले आहे.महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेली विश्वकर्मा ही महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योगांना बळ देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या योजनेतील कर्ज धारकांना अत्यंत कमी व्याजदर पाच टक्के (5 टक्के) आणि विविध व्यवसायासाठी लागणारे संच खरेदीसाठी (टूलकिट) मदतही दिली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande