जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी; राजकीय हालचालींना वेग
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे नुकत्याच झालेल्या नगपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा
ZP pune


पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे नुकत्याच झालेल्या नगपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा दिसले. मात्र, भाजपकडून संघटन वाढवत जोरदार तयारी सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढण्याच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकाधिक जागा लढविण्याची तयारी केली आहे.महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता युती आणि आघाड्यांबाबत सर्वच पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली होती. तेव्हापासून जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत सुमारे पावणेचार वर्षे प्रशासक कालावधी होता.या कालावधीमध्ये राज्यासह जिल्ह्यातील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विभाजन झाले आहे. राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून बांधणी सुरू आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत निवडणूक लढवणार असल्याचे तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande