कोकणातील विद्वानांच्या संस्कृत साहित्यातील योगदानाबाबत रत्नागिरीत शनिवारी चर्चासत्र
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, दि.
कोकणातील विद्वानांच्या संस्कृत साहित्यातील योगदानाबाबत रत्नागिरीत शनिवारी चर्चासत्र


रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, दि. १७ जानेवारी रोजी कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्राच्या माध्यमातून कोकणातील विद्वानांची संस्कृत साहित्यातील भूमिका व योगदान स्पष्ट केले जाणार आहे. शिवाय कोकणातील संस्कृत साहित्यिक व विद्वान यांच्या कार्याचा सूक्ष्म शोध घेण्याची संशोधनात्मक दृष्टी निर्माण होणार आहे.

चर्चासत्रातील सहभाग नि:शुल्क असेल. दुपारी भोजनाची व्यवस्था असेल. चर्चासत्रातील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे शिक्षक, विद्यार्थी आणि संस्कृतप्रेमी नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता कविकुलगुरू कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात (एसटी बसस्थानकासमोर, रत्नागिरी) येथे होणार आहे. चर्चासत्रातील सर्व विषय मराठी माध्यमातूनच होणार आहेत.

इच्छुकांनी https://forms.gle/WkiFKG8cZ5pLMGHH6 हा अर्ज भरून एकदिवसीय चर्चासत्रासाठी नोंदणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande