
रत्नागिरी, 15 जानेवारी, (हिं. स.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. या दिनाचे औचित्य साधून येथील माहेर संस्थेने चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धा इयत्ता पाचवी ते बारावी आणि खुला गट असे दोन गट आहेत. स्पर्धेचे विषय असे - 1. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, 2. शिवकालीन कोणत्याही एका किल्ल्याचे चित्र, 3. शिवराज्याभिषेक चित्र, 4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक धाडसी प्रसंग.
कोणत्याही एका विषयावरील चित्र घरी काढून ते संस्थेच्या पत्त्यावर ३१ जानेवारीपर्यंत कुरियरने पोस्टाने किंवा प्रत्यक्ष भेटून पाठवावे. चित्राच्या मागे किंवा स्वतंत्र कागदावर चित्रकाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, गट व विषय लिहिणे गरजेचे आहे.
चित्रकला स्पर्धा निःशुल्क असून पहिल्या तीन विजेत्या चित्रकारांना माहेर संस्थेकडून शिवजयंतीच्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळेल.
स्पर्धकांनी आपली चित्रे सुनील कांबळे, अधीक्षक, प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते. माहेर संस्था, समर्थ नगर, तारवेवाडी, हातखंबा, निवळी फाट्याजवळ, रत्नागिरी-415619 या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी 9011086136, 7888099586 किंवा 7888099583 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी