सिल्लोड नगराध्यक्ष चषक स्पर्धा अब्दुल समीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।सिल्लोड नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कला क्रीडा आणि विज्ञान महोत्सव नगराध्यक्ष चषक शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील व
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।सिल्लोड नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कला क्रीडा आणि विज्ञान महोत्सव नगराध्यक्ष चषक शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सिल्लोड नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगर परिषदेतील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, नगरसेवक रउफ बागवान, रईस मुजावर, सिद्धेश्वर आहेर, अकिलवसईकर, महंमद नूर कुरेशी, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, सचिन पाखरे, शेख कय्युम, सय्यद पाशु आदींची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि विविध स्पर्धांचे बक्षीस मिळविले. सर्वाधिक पदकाची कमाई करणारी शाळा नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, सिल्लोड या शाळेला नगराध्यक्ष चषक देऊन नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande