सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात झाली. पडीक जमीन व जलव्यवस्थापन यासाठी युवा हे ब्रीद घेऊन या शिबिराची सुरुवात झाली. यासाठी संस्थेचे सचिव अशोक देवरे हे उद्घाटक
सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात


छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात झाली. पडीक जमीन व जलव्यवस्थापन यासाठी युवा हे ब्रीद घेऊन या शिबिराची सुरुवात झाली. यासाठी संस्थेचे सचिव अशोक देवरे हे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जी.जी. राजपूत तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. बी. लांब, रासेयो. जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सी. एम. काळे, वरूड गावचे सरपंच दीपक कळम, उपसरपंच गुलाब मिरगे उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात माजी सरपंच भानुदास मिरगे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

या सात दिवसीय शिबिरात

बालविवाह व मतदान जनजागृती, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान व अयोग्य तपासणी शिबिर तसेच जलसंवर्धन व पडीक जमीन व्यवस्थापन हे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन गावाच्या विकासात मोलाचे योगदान मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande