छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. येथील शासकीय
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज


शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड

छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावर आत शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या गोंधळात माजी महापौर विकास जैन यांनाही पोलिसांच्या लाठीचा फटका बसला असून काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

पॉलिटेक्निक कॉलेज येथील केंद्रावर मतमोजणीची तयारी सुरू असताना उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. यावरून पोलिसांशी कार्यकर्त्यांची हुज्जत सुरू झाली. वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला.

या लाठीमारात माजी महापौर विकास जैन यांनाही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. जैन यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. या राड्यानंतर केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जो पर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोवर मतमोजणी सुरु करायला देणार नाही अशी मागणी करत कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले आहेत.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande