हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम
• लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम लातूर, 15 जानेवारी (हिं.स.)। धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांचा
हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम


• लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

लातूर, 15 जानेवारी (हिं.स.)। धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत केला जाणार आहे. यानिमित्त आजपासून जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘प्रभात फेरी’च्या माध्यमातून शिक्षण विभाग करत आहे. प्रभात फेरी गुरूवार पासून (दि.१६ ते २३ जानेवारी) जिल्हाभरातील शाळांमधून निघणार आहे. नांदेड येथील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचा इतिहास पोहचविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत २५ जानेवारीपर्यंत सर्व शाळांच्या नित्य परिपाठात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे, त्यांच्या जीवनपटावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर १७ जानेवारीपर्यंत दरम्यान चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होतील. जिल्हास्तरावर विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव नांदेड येथे आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊनही सन्मानित केले जाईल.

#hinddichadar350 या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी आणि तरुणाईने #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट, फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande