अमरावतीत दुपारी ३.३० पर्यंत ४०.६२ टक्के मतदान, सर्वपक्षीयांकडून विजयाची जय्यत तयारी
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुका गुरुवारी मोठ्या उत्सहात पार पडल्या अमरावतीकर नागरिकांनी मतदानात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला उद्याला या मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीत कोणता राजकीय पक्ष कि अपक्ष बा
उद्याला विजयाचा गुलाल कोण उधळणार ? सर्वच राजकीय पक्षांनी केली विजयाची जय्यत तयारी  दुपारी ३.३० पर्यंत ४०.६२ टक्के मतदान


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुका गुरुवारी मोठ्या उत्सहात पार पडल्या अमरावतीकर नागरिकांनी मतदानात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला उद्याला या मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीत कोणता राजकीय पक्ष कि अपक्ष बाजी मारतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावती महानगर पालिकेच्या ८७ जागांसाठी तब्बल ६६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.मतदान सुरक्षित पणे पार पडावे या करीत २७०० पोलिसांचा विशेष बंदोबस्त आज शहरात लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त राकेश ओला स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीवर बारीकर लक्ष देऊन होते.सकाळी मतदान झाल्यावर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्यात मात्र त्यानंतर तो प्रश्न प्रशासनाने लगेच निकाली काढला. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४४ प्लस चा आकडा जो पक्ष सहज पार करेल त्या पक्षाचा महापौर अमरावती महानगरपालिकेवर विराजमान होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी विजयाची जोरदार तयारी केली असून उद्याला कोणत्या पक्षाला किती बलाबल मिळते हे बघणे औसुक्याचे ठरणार आहे. दुपारी ३.३० पर्यंत ४०.६२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळच्या सुमाराच अनेक मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजवतात त्यामुळे मतदानाची टक्केवारी हि ६५ ते ७० टक्के पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजनीला सुरुवात होणार आहे. तर दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण मातमोजणीच चित्र स्पस्ट होणार आहे. ऐकून १४ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande