अकोला : पैशांसाठी मतदानाचा आरोप
काँग्रेस उमेदवारांनी रंगेहाथ पकडल्याचा दावा अकोला, 15 जानेवारी (हिं.स.) : अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही व्यक्त
Photo


काँग्रेस उमेदवारांनी रंगेहाथ पकडल्याचा दावा

अकोला, 15 जानेवारी (हिं.स.) : अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही व्यक्तींनी मतदारांना पैसे देऊन मतदान करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप केला की, मतदान केंद्र परिसरात खुर्ची टाकून बसलेला एक व्यक्ती मतदारांना “पैसे घ्या आणि मतदान करा” असे सांगत होता. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती चिठ्ठ्या हातात घेऊन रंगेहाथ पकडली गेली असून या घटना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काँग्रेस उमेदवारांनी जिल्हाधिकारी, निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande