अकोला : पिंक मतदान केंद्रावर आकर्षक सुविधा
“मी जागृत मतदार” सेल्फी पॉईंटचे केंद्रस्थानी लक्ष अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सीत
Photo


“मी जागृत मतदार” सेल्फी पॉईंटचे केंद्रस्थानी लक्ष

अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सीताबाई कला महाविद्यालयात पिंक मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती.

या केंद्रावर मतदारांसाठी आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मतदानानंतर आठवण म्हणून फोटो काढता यावा यासाठी “मी जागृत मतदार” सेल्फी पॉईंट आणि सेल्फी चेअर उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळला.नागरिकांमध्ये लोकशाहीची भावना दृढ व्हावी आणि मतदानाचे महत्त्व वाढावे यासाठी या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande