सिंधुदुर्ग : अक्षरोत्सव परिपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज : वसंथा राय
सिंधुदुर्ग, 15 जानेवारी, (हिं. स.) : अक्षरोत्सव संग्रह म्हणजे परिपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहे. याचे व्यवस्थित जतन करून ठेवणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. ते तुम्ही विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित करून अत
तळेरे येथील अक्षरघराला भेट दिल्यानंतर विविध संदेश पत्रे पाहताना एचपीसीएलचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक वसंथा राय (हैदराबाद) आणि वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष विजय केसरकर


सिंधुदुर्ग, 15 जानेवारी, (हिं. स.) : अक्षरोत्सव संग्रह म्हणजे परिपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहे. याचे व्यवस्थित जतन करून ठेवणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. ते तुम्ही विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित करून अत्यंत कल्पकतेने देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवत आहात. हे कार्य अधिकाधिक व्यापक व्हावे, अशी अपेक्षा एचपीसीएलचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक वसंथा राय (हैदराबाद) यांनी केले.

तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांचा आगळावेगळा संग्रह असलेल्या अक्षरघराला श्री. राय आणि वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष, एचपीसीएलचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक विजय केसरकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अक्षरोत्सव संग्रहाची पाहणी केली आणि प्रोत्साहन देत कौतुक केले.

यावेळी त्यांनी अनेक संदेशपत्रे आवर्जून वाचली. कुतूहलापोटी अनेक व्यक्तींविषयी सविस्तर जाणूनही घेतले. या संग्रहाची संकल्पना कशी सुचली याबाबतही माहिती घेतली. काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या संग्रहामध्ये जागतिक कीर्तीचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिजित बार्दो (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande