चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला प्रारंभ
चंद्रपूर, 15 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत १७ प्रभागांमध्ये ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार नशीब आजमावित आहेत. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदान संध्याकाळी साडेपाच वाज
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला प्रारंभ


चंद्रपूर, 15 जानेवारी (हिं.स.)।

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत १७ प्रभागांमध्ये ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार नशीब आजमावित आहेत. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदान संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे. मतदारांना सुरक्षित, सुलभ व आदर्श मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी आधीच करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून शहरात ५ पिंक बूथ व ५ आदर्श बूथ निश्चित करण्यात आले आहेत.

चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात २ लक्ष ९९ हजार ९९४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावीत आहेत. त्यासाठी ३५५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande