दिव्यांग लाभार्थ्यांना UDID–आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
जळगाव, 15 जानेवारी, (हिं.स.) जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांचे UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनि
दिव्यांग लाभार्थ्यांना UDID–आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन


जळगाव, 15 जानेवारी, (हिं.स.) जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांचे UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य आहे. तरीही अद्याप ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी आपले UDID कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र, अद्यावत आधार कार्ड तसेच बँक पासबुक घेऊन २७ जानेवारी २०२६ पूर्वी संजय गांधी शाखा, तहसील कार्यालय, जळगाव येथे उपस्थित राहून कागदपत्रे जमा करून माहिती अद्यावत करून घ्यावी.

शासन निर्देशांनुसार विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करता पडताळणी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती अद्यावत केली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार शितल राजपुत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande