कोल्हापूरात तांत्रिक अडचणी तरीही सुरळीत मतदान
कोल्हापूर, 15 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचा तांत्रिक बिघाड, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्रात नावे मिळत नसल्यान
महापालिका निवडणुकीसाठी मतदान


कोल्हापूर, 15 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचा तांत्रिक बिघाड, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्रात नावे मिळत नसल्याने गोंधळ, चार मतदानासाठी लागणारा वेळ, निवडणूक आयोगाकडून दिलेल्या ऑनलाईन लिंक्स बाबत संभ्रम अशा वातावरणात सकाळच्या सत्रात मंदगतीने सुरु असलेले मतदान शासकीय यंत्रणेच्या प्रयत्ना नंतर दुपारनंतर सुरळीत सुरु झाले आणि मतदानाचा वेग वाढला तरीही सकाळ पासून सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदारांचा मतदानाचा आणि कार्यकत्यांचा मतदान करून घेण्याचा उत्साह कायम राहीला.

कोल्हापूर महापालिकेच्या 81 जागांसाठी 595 मतदान केंद्रावर तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी मतदान झाले. दोन्ही शहरातील मतदारांनी मतदानात उत्साहात भाग घेऊन मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले..

राजकिय पक्ष आणि उमेदवारांनी आपआपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जास्तीत मतदान करून घेण्यासाठी धावपळ केली. शासकीय यंत्रणेने मतदारांना विनासायास मतदान करता यावे यासाठी यंत्रणा राबवली वयोवृद्ध, दिव्यांग, आजारी मतदारांनाही मतदान करता यावे यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवल्या. सर्वच मतदान केंद्रांच्या आवारात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी किरकोळ तणाव निर्माण झाला. तर नेत्यांचे राजकीय कलगीतुरेही रंगले. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, भाजपा खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील यशवंतराव पाटील विद्यामंदिराच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली. महायुती विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात बहुमत आहे. त्यामुळं काँग्रेसला चांगले महाराष्ट्रात सर्व महापालिकेत मिळेल. महाराष्ट्रात महायुती स्वतंत्र लढत आहेत. मात्र कोल्हापुरकरांच्या भीतीमुळं कोल्हापुरात माहिती एकत्र आले आहेत. भाजपा- महायुतीकडे प्रंचड पैशाची ताकद आहे, दडपशाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यापर्यंत वेळ त्यांच्यावर आहे. शेवटच्या 24 तासांत आमच्या कार्यकर्त्यांना उचलून नेण्याचा प्रयत्न झाला, तो आम्ही हाणून पाडला. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा नेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं या दडपशाहीला कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर आणि काँग्रेसवर विश्वास दाखवतील, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

पुढं ते म्हणाले की, भाजपा महायुतीनं चांगलं काम केलं असेल तर मग दडपशाहीचं त्यांनी राजकारण करू नये. मतदान केंद्रावर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहेत. मात्र प्रशासन त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करत आहे. कोल्हापुरातल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर जनतेचा विश्वास नाही. त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना येवून कोल्हापूरकरांना विश्वास द्यावा लागला. एवढी वेळ त्यांच्यावर आली आहे, या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर माझ्याबरोबर असतील. मतदार यादीतील घोळ अजूनही प्रचंड आहे. तो आम्ही निदर्शनास आणून दिला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार केंद्र बनवली आहेत. पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्याला त्रास होवू नये असं केलं आहे. एवढी वर्ष निवडणूक आयोग मतदान घेतं. त्यासाठी महाराष्ट्र शासन पैसे देतं. त्यामुळं अपडेट होणं गरजेचं आहे. मतदार यादीत आमदारांची नावं नसणं हे लोकशाहीचं दुर्दैवं आहे. मतदार यादी दोषयुक्त आहे की दोषमुक्त नाही, हे यावरून स्पष्ट होतं. कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले तरी कोल्हापूरकर सुज्ञ आहेत ते माझ्याबरोबर आणि काँग्रेसबरोबर राहतील, असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील, असं म्हटलं आहे. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील. महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल. आज माझा वाढदिवस साजरा करणार नाही. उद्या महायुतीच्या विजयच माझा वाढदिवस असेल तर 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी अशी टॅगलाईन लागलेली उद्या तुम्हाला दिसेल. इचलकरंजीत सुद्धा महायुतीला पूर्ण समर्थन मिळेल. महायुतीचे महापौर झालेले राज्यात दिसतील. सतेज पाटलांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांच्या मानसिकतेवर थोडा ताण आला आहे. सतरंज्या उचलण्याचा काम कायमपणाने कार्यकर्ते करतात. आम्हीही केलं आहे. कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवार मिळणंही मुश्किल झालं होतं. तीन ठिकाणी एकाच घरात उमेदवारी तर मुलाला आणि मुलीला उमेदवारी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. सतेज पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यात प्रचंड पैशाचं वाटप झालं. तुमचं चांगलं काम असेल तर पैसे वाटण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे. त्यामुळं कोल्हापूरची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच राहील. तसंच कोल्हापूरची जनशक्ती महायुतीसोबत राहील, असंही खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande