
नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.) – नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत पार पडले. प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमध्ये सरासरी 55 टक्के तर मालेगावमध्ये 57 टक्के मतदान झाले.
नाशिक महानगरपालिकेत 122 आणि मालेगाव महानगरपालिकेत 84 जागांसाठी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. सुरुवातीला मतदान मंद होते, परंतु नंतर हळूहळू गती पकडली. मतदान संपण्याच्या वेळी नाशिकमध्ये अंदाजे 57 टक्के तर मालेगावमध्ये 55 टक्के मतदान झाले.दरम्यान, काही प्रभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती दिसून आली. नाशिक रोड प्रभाग 17 येथे भाजप उमेदवाराच्या गाडीमधून दोन लाख रुपये आढळले, तर सिडको प्रभाग 25 मध्ये पैसे वाटपाचे प्रकार झाल्याची माहिती मिळाली. प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रित केली.
मतदान प्रक्रियेवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी लक्ष ठेवले. त्यांनी अनेक मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून शांत आणि सुरळीत मतदान सुनिश्चित केले.मतदानानंतर, भाजपचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी उमेदवारीसाठी मतदारांचे आभार मानले आणि 80 पेक्षा जास्त जागांवर विजयाची अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीतर्फे माजी खासदार समीर भुजबळ यांनीही मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV