पुण्यात मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, मतदार चक्रावले!
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत अनेक त्रुटी उघड्या पडल्या आहेत. विशेषतः सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मतदारांना आपलं मत नेमकं कुणाला पडलं, हे
पुण्यात मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, मतदार चक्रावले!


पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत अनेक त्रुटी उघड्या पडल्या आहेत. विशेषतः सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मतदारांना आपलं मत नेमकं कुणाला पडलं, हे कळण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी यंत्रे यावेळी ईव्हीएमसोबत ठेवण्यात आली नाहीत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची विधाने केली.

या प्रकरणात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपीएटी यंत्रे उपलब्ध करवण्याची मागणी केली होती. इतकंच नव्हे तर, ते न्यायालयातही गेले होते. परंतु, आयोगाने न्यायालयातही ही मागणी फेटाळली आणि व्हीव्हीपीएटी सोबत ठेवण्यास नकार दिला. परिणामी, मतदारांना आपल्या मताची पडताळणी करण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय, मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण राहिले.

मतदान केंद्रावर आणखी काही समस्या दिसून आल्या. मतदारांना त्यांचे मोबाइल फोन बंद करण्यास सांगितले जात होते. नाव शोधण्यातही गोंधळ उडाला, कारण एका मतदान बूथवर तब्बल ९०० नावांची यादी आहे. या सर्व गोष्टींमुळे मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह वाटली नाही. मतदारांनी या मुद्द्यांवरून तक्रारी नोंदवल्या, पण तात्काळ निराकरण झाले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande