नांदेड - किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी पठाण
नांदेड, 15 जानेवारी, (हिं.स.)। किनवट नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी पार पडलेल्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षपदी हसन खान पठाण यांची निवड करण्यात आली. ही निवड ११ विरुद्ध १२ मतांनी झाली. सदर
नांदेड - किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी पठाण


नांदेड, 15 जानेवारी, (हिं.स.)। किनवट नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी पार पडलेल्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षपदी हसन खान पठाण यांची निवड करण्यात आली. ही निवड ११ विरुद्ध १२ मतांनी झाली.

सदर सभेच्या पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार होत्या, तर मुख्याधिकारी मुंगाजी काकडे यांनी सचिव म्हणून काम पाहिले. उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून हसन खान पठाण, तर महायुतीकडून माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानात दोन्ही उमेदवारांना ११-११ मते मिळाल्याने नगराध्यक्षांना असलेल्या विशेष अधिकारानुसार कास्टिंग वोट देण्यात आले. हे मत हसन खान पठाण यांच्या बाजूने गेल्याने त्यांना पीठासीन अधिकाऱ्यांनी विजयी घोषीत केले. मात्र या निकालावर माजी उपनगराध्यक्ष तथा उपाध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास नेम्मानीवार यांनी आक्षेप नोंदवला. दोन्ही बाजूने ११,११ मते झाल्यानंतर नगराध्यक्षांनी निर्णायक दुसरे मत टाकताना हात उचलला नसल्याचा आरोप केल्याने

मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

दरम्यान, स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य पदासाठी दोन नामांकनपत्रे दाखल झाली होती. शिवसेना (उबाठा) गटाकडून प्रशांत कोरडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी नगराध्यक्ष साजिद खान यांचे नामांकन होते. प्रशांत कोरडे यांच्या नामांकनात तांत्रिक अडचण आल्याने त्यांची निवड घोषित होऊ शकली नाही, तर साजिद खान यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली. या सभेला नगराध्यक्ष सुजाता एंड्रलवार,हसन खान पठाण, चंद्रशेखर नेम्मानीवार, श्रीराम नेम्मानीवार, गंगाबाई कोल्हे, निलोफर भाटी, प्रवीण राठोड, श्रीमती बेग, नेइमा बेगम, ललिताबाई मुनेश्वर, अभय महाजन, अश्विनी जागरलावार हे महाविकास आघाडीचे तर महायुतीचे श्रीनिवास नेम्मानीवार सुरज सातुरवार, अभय नगराळे, निकिता आयनिवार, सरोजिनी ओद्दीवार, प्रीती नडपेलवार संतोष मरस्कोल्हे, शेख सादीका इमरान खान, गुलबतखान आकबर, खान जरीना साजिद, नुरसबा मुकद्दर हे नगरसेवक उपस्थित होते. तसेच शेखर

नेम्मानीवार, ललिता मुनेश्वर, प्रीती नेमानीवार हे तीन अपक्ष नगरसेवकांचीही उपस्थिती होती. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. या संपूर्ण प्रक्रियेत अपक्ष नगरसेवक चंद्रशेखर रंगराव नेम्मानिवार व सौ. ललिता मारोती मुनेश्वर यांची भूमिका निर्णायक ठरली.

यावेळी बेबीताई नाईक, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपसभापती राहुल नाईक, बंडु नाईक, धनलाल पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande