
लातूर, 15 जानेवारी (हिं.स.)। येथील यशवंत विद्यालयात इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शुभम मारोती नाकसाखरे हा मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून बेपत्ता झाला आहे. शुभम सकाळी ठीक ६ वाजता शाळेत जातो असे सांगून घरून निघाला होता, मात्र तो शाळेत पोहोचला नाही आणि त्यानंतर घरीही परतला नाही. शुभमच्या डोळ्याच्या डाव्या बाजूला जन्मजात काळा टिक्का (जन्मखूण) असून बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या अंगात काळ्या रंगाचे जॅकेट होते. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. जर हा मुलगा कोणाला आढळल्यास किंवा त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास कृपया ९०६७२६८३९४ किंवा ९७६४१९३२८८ या क्रमांकावर अथवा अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार (९०४९९८६०८४) किंवा तानाजी आरदवाड (९८५०५९१४४३) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis