
छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.६३ गट, १२६ गणांमध्ये निवडणूक होणार आहे.
मतदार संख्या- तालुकानिहाय मतदार संख्या याप्रमाणे-
सोयगाव- पुरुष-४५९७१, स्त्री-४१७७५ इतर- १, एकूण-८७७४७
सिल्लोड- पुरुष-१२९८६५, स्त्री-११९००८ इतर- १, एकूण-२४८८७४
कन्नड- पुरुष-१३५५५३, स्त्री-१२२५२३ इतर- ४, एकूण-२५८०८०
फुलंब्री- पुरुष-६६७५१, स्त्री-६१०७१ इतर- १, एकूण-१२७८२३
खुलताबाद- पुरुष-४४४५३, स्त्री-४०८५३ इतर- १, एकूण-८५३०७
वैजापूर- पुरुष-११६९४३, स्त्री-१०७००४इतर- ०, एकूण-२२३९४७
गंगापूर- पुरुष-१५५२०६, स्त्री-१४२५४४ इतर- १४, एकूण-२९७७६४
छत्रपती संभाजीनगर- पुरुष-१५५२२४ स्त्री-१४०५२७ इतर- १५, एकूण-२९५७६६
पैठण- पुरुष-१२९२६८, स्त्री-११८४७३ इतर- ४, एकूण-२४७७४५
जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष , ८ लाख ९३ हजर ७७८ स्त्री तर ४१ इतर असे एकूण १८ लक्ष ७३ हजार ०५३ मतदार आपल मतदानाचा हक्क बजावतील.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे स्वीकारण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आले होते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देनपत्रे स्वीकारण्यात येतील.
‘जातवैधता पडताळणी बाबत-
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण क्षेत्रात होणार आहे. तालुकानिहाय गट व गणांची संख्या याप्रमाणे- सोयगाव-३ गट, ६ गण, सिल्लोड-९ गट, १८ गण, कन्नड-८ गट, १६ गण, फुलंब्री ४ गट, ८ गण, खुलताबाद-३ गट, ६ गण, वैजापूर-८ गट, १६ गण, गंगापुर-९ गट, १८ गण, छत्रपती संभाजीनगर १० गट, २० गण, पैठण ९ गट, १८ गण असे एकूण ६३ गट व १२६ गण आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एक निवडणूक निर्णय अधिकारी व एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहतील. एकून २२८२ मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या याप्रमाणे- सोयगाव-११३, सिल्लोड-३०५, कन्नड-३१७, फुलंब्री-१५५, खुलताबाद-१०४, वैजापूर-२८१, गंगापूर-३४७, छत्रपती संभाजीनगर-३५४, पैठण-३०६.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis