अमरावतीत भाजपाला मोठा धक्का, फडणवीसांच्या मामेभावाचा पराभव
अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.) अमरावती महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी कलोती यांना पराभूत केले आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आ
देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव; अमरावतीत भाजपाला मोठा धक्का!


अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.)

अमरावती महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी कलोती यांना पराभूत केले आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामुळेच फडणवीस यांच्या मामेभावाचा पराभव झाला, असा आरोप भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यादरम्यान विवेक कलोती यांच्या पराभवावर भारतीय जनता पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती महापालिकेतील ८७ जागांसाठी गुरुवारी (१४ जानेवारी) शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार होता. मात्र, प्रचाराच्या धामधुमीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने अचानक भाजपाची साथ सोडली. त्यामुळे काँग्रेस व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होताच भाजपा व काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती; तर रवी राणा यांच्या पक्षातील उमेदवार पिछाडीवर होते. अमरावतीत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande