
अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.)
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ६५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण हा किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही वर्षांपासून डायलिसिस करत होता . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा आज रुग्णालयात झालेले ६५ वे किडनी प्रत्यारोपण, हे २९ वर्षीय शेख फारुख शेख सत्तार यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण हा वाशीम येथील रहिवासी असुन मागील काही वर्षापासून डायलिसिस चालु होते मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई नसीमबानो शेख सत्तार (४७वर्ष )यांनी आपली एक किडनी मुलगा फारुख ला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी फारुख ला देऊन त्याला नवीन जीवन दिले.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी