
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।सिल्लोड तालुका पंचायत समितीची आमसभा आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या प्रांगणात पार पडली. या आमसभेत विविध गावांच्या महिला पुरुषांनी आपल्या समस्या मांडल्या. यावर आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करून अनेकांच्या समस्यांचे जागेवर निराकरण केले.सिल्लोड तालुका पंचायत समितीची आमसभा आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या प्रांगणात पार पडली.
आमसभेत विहीर व घरकुलाचे रखडलेले अनुदान, वीज समस्या, सिंचन व व्ययक्तिक विहीर, गायगोठा, पाणंद रस्ते, पाणीटंचाई, रस्ते दुरुस्ती, फेरफार नोंदी, रेशनकार्ड, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांचे फोन न उचलणे, शासन स्तरावरील कामे वेळेत न करणे, कार्यालयात उशिरा येणे आदी तक्रारींवरून आ. अब्दुल सत्तार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
'सिल्लोड तालुक्यातील विहीर आणि घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. रोजगार हमीचे कामे सुरू करा, सातबारा वर विहिरींची नोंद घेणे, गायरानवरील घरकुलची जागा नावावर करणेची कारवाई कामी जिल्हाधिकारीयांच्याकडे प्रस्ताव सादर करावा,' अशा सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गावकऱ्यांच्या शासन स्तरावरील विविध अडचणी, समस्या दूर करण्यासाठी गावागावात ग्रामसभा घ्या, ग्रामसभेत आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा असे निर्देश देत ग्रामसभेला संसदेप्रमाणे महत्त्व असून गावकऱ्यांनी ग्रामसभेत सहभागी होवून आपल्या अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी केले.प्रशासकीय स्तरावरील येणाऱ्या अडचणी गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या सभेत सत्तार यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा असे निर्देश दिले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis