रक्तदान आणि अन्नदान हे पुण्याचे काम : महेंद्रशेठ घरत
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। पनवेल तालुक्यातील वहाळ येथील साई मंदिरात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अन्नदान आणि रक्तदान या दोन्ही पुण्यकर्मांचा संगम साधत त्यांन
पनवेल तालुक्यातील वहाळ येथील साई मंदिरात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अन्नदान आणि रक्तदान या दोन्ही पुण्यकर्मांचा संगम साधत त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली.  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले महेंद्रशेठ घरत हे केवळ बोलघेवडे नव्हे तर कृतीतून आदर्श घालून देणारे नेतृत्व आहे, हे त्यांच्या या उपक्रमातून स्पष्ट झाले. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. रक्तदान शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे रक्तदान करत आहे. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान आणि अन्नदान यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही. आज साई मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर हे दोन्ही पुण्यकर्म करण्याचा आनंद मला मिळत आहे.”  साई मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध सामाजिक उपक्रम, कलाकारांना व्यासपीठ आणि जनजागृतीसाठी साई मंदिराकडून होत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.  श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचे स्वागत करून त्यांच्या रक्तदानाबद्दल अभिनंदन केले. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जाणिवेचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.


रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। पनवेल तालुक्यातील वहाळ येथील साई मंदिरात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अन्नदान आणि रक्तदान या दोन्ही पुण्यकर्मांचा संगम साधत त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले महेंद्रशेठ घरत हे केवळ बोलघेवडे नव्हे तर कृतीतून आदर्श घालून देणारे नेतृत्व आहे, हे त्यांच्या या उपक्रमातून स्पष्ट झाले. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. रक्तदान शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे रक्तदान करत आहे.

एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान आणि अन्नदान यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही. आज साई मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर हे दोन्ही पुण्यकर्म करण्याचा आनंद मला मिळत आहे.” साई मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध सामाजिक उपक्रम, कलाकारांना व्यासपीठ आणि जनजागृतीसाठी साई मंदिराकडून होत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचे स्वागत करून त्यांच्या रक्तदानाबद्दल अभिनंदन केले. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जाणिवेचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande