नांदेड मनपात भाजपाचा महापौर होणार, अशोक चव्हाणांनी राखला गड
नांदेड, 16 जानेवारी (हिं.स.)। आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नांदेड महापालिकेत एकूण 81 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील एकूण 40 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. अजूनही भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष सहा जागांव
नांदेड मनपा


नांदेड, 16 जानेवारी (हिं.स.)।

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नांदेड महापालिकेत एकूण 81 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील एकूण 40 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. अजूनही भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष सहा जागांवर आघाडीवर असून एका जागेवर विजय झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण सात जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि आघाडी पक्षाचे उमेदवार 4 जण आघाडीवर असून 6 जणांचा विजय झाला आहे. येथे एमआयएम पक्षाचेही एकूण चार उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, नांदेड महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठी ताकद लावली होती. सभा, बैठका याचा त्यांनी धडाका लावला होता. विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हाताशी धरून त्यांनी घरोघरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. ही निवडणूक म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई होती. आता निकाल स्पष्ट झाला असून येथे 81 पैकी 40 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे इथे भाजपाचाच महापौर होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande