धुळ्यात भाजपकडून विजयाचा जल्लोष
धुळे, 16 जानेवारी (हिं.स.) धुळे येथील महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. अपवाद वगळता भाजपचे बहुतांश उमेदवारांच्या गळ्यात धुळेकरांनी विजयाची माळ घातल्याने आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या
भाजप लोगो


धुळे, 16 जानेवारी (हिं.स.) धुळे येथील महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. अपवाद वगळता भाजपचे बहुतांश उमेदवारांच्या गळ्यात धुळेकरांनी विजयाची माळ घातल्याने आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात आज दुपारी बारापासूनच अभूतपूर्व जल्लोषाला प्रारंभ झाला. जय श्रीरामचा जयघोष आणि गुलालची उधळण करत कार्यकत्यारनी आमदार कार्यालयात नृत्याचा ठेका धरल्याने वातावरण अक्षरश..भगवामय झाले होते. मतमोजणीला आज सकाळी दहापासून प्रारंभ झाला. पहिल्या दीड-दोन तासांतच निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकत्यारकडून एकच जल्लोष सुरू झाला होता. येथील आमदार अनुपभय्यांच्या कार्यालयात आज सकाळपासूनच आमदार अग्रवाल यांच्यासह माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जसजसा एकेक प्रभागाचा निकाल जाहीर होत होता, तसा सवारकडून जल्लोष करण्यात येत होता. तसेच अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या विजयी उमेदवारांसह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते मतमोजणी केंद्रापासून थेट आमदार अनुपभय्यांच्या कार्यालयात मिरवणुकीने पोहोचत होते. तेथे आल्यानंतर आमदार अनुपभय्यांसह विजयी उमेदवारांना खांद्यावर घेत समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. यामध्ये भगव्या गुलालाची उधळण करण्यात येत असल्याने संपूर्ण कार्यालय परिसर भगवामय झाला होता. सोबतीला जय श्रीरामच्या गीतांसह ढोल- ताशांच्या गजरात नृत्याचा ठेका धरत कार्यकत्यारनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande