
जळगाव , 16 जानेवारी (हिं.स.)जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ पैकी ६३ जागांसाठी काल गुरुवारी मतदान झाले. यानंतर आज १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून यामध्ये महायुती सुसाट दिसून आली. जळगाव महापालिकेत महायुतीला प्रचंड प्रतिसाद जळगावकरांनी दिल्याचं मतमोजणीतून दिसून आले असून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.जळगाव महापालिकाच्या आतापर्यंत हाती आलेले निकालात भाजपचे सर्वात जास्त उमेदवार विजयी झाले. महापालिकेवर महायुतीने झेंडा फडकविला आहे.जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपने ४७, शिवसेना शिंदे गटाने २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पैकी भाजपने ४७ पैकी ४६ जागांवर विजयी आघाडी घेतली असून शिवसेना शिंदे गटाला देखील २३ पैकी २२ जागांवर विजयी आघाडी मिळाली. तर अजित पवार गटाचा पाच पैकी एकच उमेदवार विजयी झाले आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहे. तर एक अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर