
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। जालना शहरातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला जालना महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत दिले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे जालना महानगरपालिका पूर्णतः भाजपच्या ताब्यात आली असून, शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.असे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की,या निवडणुकीत जालना शहरातील सर्व स्तरातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विकास, पारदर्शक कारभार आणि स्थिर नेतृत्वाला कौल दिला आहे. हा विजय म्हणजे केवळ पक्षाचा नव्हे, तर जालना शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने दिलेला विश्वासाचा जनादेश आहे.
या जनादेशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, मतदारांना दिलेली सर्व आश्वासने वेळेत, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून जालना शहराला महाराष्ट्रातील आदर्श महानगरपालिका म्हणून नावारूपास आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis