चिपळूणचे नगरसेवक निहार कोवळे यांचा अवघड ठिकाणच्या स्वच्छतेचा पुढाकार
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : प्रभागातील काही भागांमध्ये अनेक दिवस तक्रारी व पाठपुरावा करूनही साफसफाई होत नसल्याच्या बाबी चिपळूणचे नगरसेवक निहार कोवळे यांच्या निदर्शनास आल्या होत्या. या संदर्भात त्यांनी आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यां
चिपळूणचे नगरसेवक निहार कोवळे यांचा कचरा हटविण्याबाबत पुढाकार


रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : प्रभागातील काही भागांमध्ये अनेक दिवस तक्रारी व पाठपुरावा करूनही साफसफाई होत नसल्याच्या बाबी चिपळूणचे नगरसेवक निहार कोवळे यांच्या निदर्शनास आल्या होत्या. या संदर्भात त्यांनी आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत संबंधित ठिकाणी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

“काम करायला सुरुवात करा, ठिकाणे अवघड असली तरी ती अशक्य नाहीत. मी स्वतः तुमच्यासोबत असेन,” असे आश्वासन देत नगरसेवक कोवळे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत त्या भागात उपस्थित राहून साफसफाईच्या कामाची सुरुवात केली. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. लोकप्रतिनिधी स्वतः मैदानात उतरून काम करत असल्याने स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळाली आहे.

निहार कोवळे चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख आहेत. त्यांच्या या कृतीमुळे प्रभागातील स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande