
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।फुलंब्री येथील नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे जमीर पठाण यांची निवड झाल्याचे पीठासीन जमीर पठाण अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी जाहीर केले. या वेळी स्वीकृत नगरसेवकपदी आसेफ अश्पाक पटेल यांची तर चिठ्ठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मनोज श्रीधरराव मुळे यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
फुलंब्री नगरपंचायतच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा झाली. सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात भारतीय जनता पक्षाकडुन योगेशमधुकर मिसाळ तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जमीर पठाण व हिना मुद्दसिर पटेल यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काँग्रेसच्या हिना मुद्दसिर पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी हातवर करून मतदान घेण्यात आले असता जमीर पठाण यांना १२ मते तर योगेश मिसाळ यांना ५ मते मिळाली. त्यानुसार उपनगराध्यक्ष म्हणून जमीर पठाण यांचे नाव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी घोषित केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक गट तर भारतीय जनता पक्षाचा एक असे तीन गट तयार झाले. आसेफ पटेल यांच्या नावाची शिफारस केली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ सारखे झाल्याने ही निवड चिठ्ठीद्वारे झाली. त्यात भाजपचे मनोज मुळे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis