
धुळे, 16 जानेवारी (हिं.स.) धुळे महापालिका निवडणूक अखेर सवारगिण विकासाच्या मुद्यावर भाजपाने एकहाती मारून नेली आहे. तब्बल ५० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवून भाजपाने राज्यात महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून सत्तेत असलेल्या पक्षांना आणि अन्य विरोधकांनाही अस्मान दाखविले. मतदानाआधि वेगवेगळ्या चार जागांवर बिनविरोध विजय संपादन करून महापालिका एकहाती ताब्यात घेण्याचे संकेत भाजपा नेते तथा पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कमदबांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी घेतलेल्या प्रचारसभेत धुळेकरांना भाजपाला मतदान करून एकहाती सत्ता सोपविण्याचे आवाहन केले होते.
धुळ्याला स्मार्ट सिटी बनविणार अशा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर धुळेकरांनी बहुमत देवून भाजपाला सत्तेसाठी बळ दिले आहे. येथील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात सुरूवात झाली. प्रारंभीक टपाली मत मोजणी झाल्यानंतर मनपाच्या निवडणुक यंत्रणेने ठरविलेल्या प्रभाग निहाय प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली. भाजपने मतदानापूर्वी चार जागांवर बिनविरोध विजयी मिळविल्यानंतर मतमोजणीतही भाजपाचाच विजयी रथ कायम राहिला. एका पाठोपाठ एक भाजपाचे उमेदवार विजयी घोषीत होत राहिले. अनेक ठिकाणी भाजपचेच संपूर्ण चारही उमेदवारांचे पॅनल विजयी झालेले आहे. प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाने सत्ताधारी भाजपाशी अनेक ठिकाणी तोडीची लढत दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र निर्णायक जागा मिळविण्यात त्यांना अपयश आले आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये छाया अहिरे यांनी नुकत्याच भाजपात प्रवेश करून भाजपाची उमेदवारी मिळविलेल्या योगेश ईशी यांचा पराभव केला. प्रभाग क्र. १७ मधील धिरज कलंत्री आणि सौ. गिता नवले यांनी विजयी संपादन केला. पैकी धिरज कलंत्री या युवा उमेदवाराने मातब्बर राजकारणी तथा माजी स्थायी समिती सभापती भाजपाचे उमेदवार शितलकुमार नवले यांचा पराभव केला. भाजपाच्या सुनंदा माळी यांचा पराभव करीत सौ. गिता नवले यांनी विजयी मिळविला आहे.
धुळे शहराचे माजी आमदार ङ्गारूक शाह यांचे चिरंजीव शाह शाहबाज यांनी राष्ट्रवादी - अजित पवार गटातर्ङ्गे उमेदवारी केली होती. त्यांचेही पूर्ण पॅनल म्हणजे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, प्रभाग क्र. १४ व १५ मधील एम.आय.एम. चे वेगवेगळ्या दोन पॅनल मधील सर्वच्या सर्व ८ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच प्रभाग क्र. १० मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर