नांदेड - कुंडलवाडीच्या उपनगराध्यक्षपदी नेहा कावार यांची निवड
नांदेड, 16 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथीलनगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नेहा कावार, तर स्वीकृत सदस्यपदी राजेश्वर उत्तरवार व सचिन कोटलावार यांची निवड झाली. नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताची सत्ता प्राप्त झाली. न
नांदेड - कुंडलवाडीच्या उपनगराध्यक्षपदी नेहा कावार यांची निवड


नांदेड, 16 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथीलनगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नेहा कावार, तर स्वीकृत सदस्यपदी राजेश्वर उत्तरवार व सचिन कोटलावार यांची निवड झाली.

नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताची सत्ता प्राप्त झाली. नगराध्यक्ष म्हणून प्रेरणा कोटलवार यांच्यासह भाजपचे १४ नगरसेवक, नगरसेविका निवडून आले. त्यानंतर उपनगराध्यक्ष कोण होणार? तसेच स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते.

नगराध्यक्षाच्या पदग्रहणानंतर न. प. सभागृहात उपनगराध्यक्षपदाच्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपनगराध्यक्षपदी नेहा शैलेश ऱ्याकावार, तर स्वीकृत सदस्यपदी राजेश्वर उत्तरवार आणि सचिन कोटलावार यांची निवड करण्यात आली.

सर्वसाधारण सभेला देगलूर तहसीलचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्यासह सर्वच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. नवनियुक्त उपनगराध्यक्ष नेहा ऱ्याकावार व स्वीकृत सदस्य राजेश्वर उत्तरवार, सचिन कोटलवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande