
लातूर, 16 जानेवारी (हिं.स.)।
लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार (Statement 6), सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत शहरात सरासरी ६०.०८% मतदान झाले आहे. सकाळी संथ गतीने सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया दुपारनंतर वेगाने वाढल्याचे दिसून आले.
महत्त्वाचे आकडे एका दृष्टिक्षेपात:
एकूण मतदार संख्या: ३,२१,३५४
सायंकाळी ५:३० पर्यंत झालेले मतदान: १,९३,०६१ (६०.०८%)
पुरुष मतदान: ९८,८१२
महिला मतदान: ९४,२३७
इतर मतदान: १२
प्रभागनिहाय चित्र:
सर्व १८ प्रभागांमध्ये मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रभाग क्र. १ आणि १८ मध्ये मतदारांचा उत्साह सर्वाधिक दिसून आला असून, तिथे मतदानाची टक्केवारी ६६% च्या पुढे गेली आहे. महिला मतदारांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मतदानाचा हक्क बजावला असून, ९४ हजारहून अधिक महिलांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली.
श्रीमती मानसी (भाप्रसे), आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे. प्रशासनाने मतदानाची ही आकडेवारी गुगल शीटद्वारे रिअल-टाइम अपडेट केली असून, नागरिकांमध्ये या पारदर्शकतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis