जळगावात मतमोजणी कक्षात गोंधळ; उमेदवाराचे धरणे
जळगाव, 16 जानेवारी (हिं.स.)जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान मतमोजणी कक्षामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक १० ड चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी मतमोजणीबाबत आक्षेप घेत धरणे आंदोलन केले. त्याम
जळगावात मतमोजणी कक्षात गोंधळ; उमेदवाराचे धरणे


जळगाव, 16 जानेवारी (हिं.स.)जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान मतमोजणी कक्षामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक १० ड चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी मतमोजणीबाबत आक्षेप घेत धरणे आंदोलन केले. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले.प्रभाग क्र १० ड चे उबाठाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने मोजणी कक्षात मोठा गोंधळ झाला. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. दरम्यान मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुलभूषण पाटील यांनी धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलन केल्याने मोठा पोलिसांचा फौज फाटा जमला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande