
नाशिक, 16 जानेवारी (हिं.स.)।
- महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मतमोजणी करत असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवधाने एमआयएम उमेदवाराच्या मतांचा आकडा जास्त सांगितल्या गेल्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आपला उमेदवार विजयी झाल्या ही माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती एमआयएमचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या झालेल्या प्रकारांची चूक लक्षात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही चूक सुधारून घेतली परंतु एमआयएमच्या मतदान केंद्रामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने काही काळ मतमोजणी थांबविण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV