
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)।
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत आपली सत्ता अधिक मजबूत केली आहे. मतमोजणी अद्याप काही प्रभागांत सुरू असली तरी बहुतांश जागांवरील निकाल स्पष्ट झाले असून पुण्यात ‘गुलाल भाजपचाच’ अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २१, काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले असून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु