
लातूर, 16 जानेवारी (हिं.स.)।
शहर महानगर पालिकेसाठी गुरुवारी (दि. १५ ) मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होणार असून त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी प्रत्येक तीन प्रभागासाठी १ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे एकूण ६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष असणार आहेत. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.उमेदवार व प्रतिनिधींना मोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठीही स्वतंत्र प्रवेश व्यवस्था असणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मोजणीसाठी १० टेबल असतील. निवडणूक निर्णय अधिकारी एका वेळी एका प्रभागाची मोजणी करणार आहेत. मत मोजणीच्या ठिकाणी मीडियासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना निकालाची माहिती दिली जाणार आहे.२ किंवा ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ४४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षाचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट व विद्युत विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis