पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी सरासरी ५२.४२ टक्के मतदान
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेसाठी गुरुवारी ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी सरासरी ५२.४२ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये ५५.५६ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये यंदा घट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी
PMC news


पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)।

पुणे महापालिकेसाठी गुरुवारी ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी सरासरी ५२.४२ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये ५५.५६ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये यंदा घट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यासाठी प्रशासनाला मध्यरात्री दोन वाजले.

काही केंद्रांवर आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६ टक्के, ११.३० वाजेपर्यंत १४.९२ टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत २६.२८ टक्के, दुपारी साडेतीनपर्यंत ३६.९५ टक्के मतदान झाले. सायंकाळी, मतदानाची वेळ संपताना शहरातील विविध प्रभागांतील झोपडपट्टी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. तर, काही भागांत रांगादेखील लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर साडेसात ते आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सरासरी ५२.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.

काही भागांत वादावादीच्या किरकोळ घटना घडल्या. हे ठराविक अपवाद वगळता महापालिकेच्या १६५ जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. महापालिकेच्या २०१७ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ५५.५६ टक्के मतदान झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande