पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी
पुणे, 16 जानेवारी, (हिं.स.)। आठ-आठ दिवस पाणी येतच नाही. कधी चुकून आलेच तर फारच कमी वेळ येते. त्यामुळे नागरिकांना पूर्णत टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागविणे भाग पडत आहे. यात नागरिकांचे लाखाे
पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी


पुणे, 16 जानेवारी, (हिं.स.)। आठ-आठ दिवस पाणी येतच नाही. कधी चुकून आलेच तर फारच कमी वेळ येते. त्यामुळे नागरिकांना पूर्णत टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागविणे भाग पडत आहे. यात नागरिकांचे लाखाे रुपये पाण्यात जात आहेत, शिवाय दूषित पाण्यामुळे आराेग्याच्या समस्या वारंवार निर्माण होत आहेत, अशी व्यथा मुंढवा चाैक ते वेस्टिन हाॅटेल चाैक या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. यामुळे या टँकर माफियांना कुणाचा वरदहस्त आहे, टँकर माफियांचा खरा ‘आका’ काेण आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नाही. परिसरातील पाणीपुरवठा व्हाॅल्व्ह बंद करून, अप्रत्यक्षपणे परिसरातील सर्व साेसायट्यांना खासगी टँकरचे पाणी घेण्यास भाग पाडले जात आहे, असा आराेप येथील नागरिक करीत आहेत. विशेष महापालिका आयुक्तांनी स्वत: यात लक्ष घालून पाणीपुरवठा विभाग आणि टँकर माफिया यांचे आर्थिक लागेबांधे आहेत का? याचा तपास करावा, अशी मागणी केली जात आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येत आहे याला कोण जबाबदार आहे, पाण्यासाठी नागरिकांची लूट थांबणार कधी?, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande