पावसाचा फटका; पांढरा कांदा उशिरा
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा परिसरात उत्पादित होणाऱ्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा पावसामुळे उशीर झाला आहे. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी कांदा काढणी यावर्षी पावसाचा कालावधी वाढ
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा परिसरात उत्पादित होणाऱ्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा पावसामुळे उशीर झाला आहे. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी कांदा काढणी यावर्षी पावसाचा कालावधी वाढल्याने रखडली असून, त्यामुळे हा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  दरवर्षी कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यात पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली. परिणामी, लागवड सुमारे पंधरा दिवस उशिरा झाली. या विलंबाचा थेट परिणाम कांद्याच्या वाढीवर आणि काढणीच्या वेळापत्रकावर झाला आहे.  शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनंतर कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काढणीनंतर कांद्याच्या माळी तयार करणे, वाळवण आणि वाहतुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कांदा बाजारात पाठविला जातो. त्यामुळे यंदा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  अलिबाग तालुक्यातील कार्ले परिसरातील पांढरा कांदा चव, टिकाऊपणा आणि गुणवत्तेमुळे विशेष ओळखला जातो. रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठांत या कांद्याला मोठी मागणी असते. यंदा मात्र पावसामुळे हा कांदा सुमारे पंधरा दिवस उशिरा बाजारात येणार असल्याचे शेतकरी सतीश म्हात्रे यांनी सांगितले.


रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा परिसरात उत्पादित होणाऱ्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा पावसामुळे उशीर झाला आहे. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी कांदा काढणी यावर्षी पावसाचा कालावधी वाढल्याने रखडली असून, त्यामुळे हा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यात पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली. परिणामी, लागवड सुमारे पंधरा दिवस उशिरा झाली. या विलंबाचा थेट परिणाम कांद्याच्या वाढीवर आणि काढणीच्या वेळापत्रकावर झाला आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनंतर कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काढणीनंतर कांद्याच्या माळी तयार करणे, वाळवण आणि वाहतुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कांदा बाजारात पाठविला जातो. त्यामुळे यंदा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्ले परिसरातील पांढरा कांदा चव, टिकाऊपणा आणि गुणवत्तेमुळे विशेष ओळखला जातो. रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठांत या कांद्याला मोठी मागणी असते. यंदा मात्र पावसामुळे हा कांदा सुमारे पंधरा दिवस उशिरा बाजारात येणार असल्याचे शेतकरी सतीश म्हात्रे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande