कोल्हापूरात गटबाजीमुळेच शिवसेना (उबाठा) अपयशी : शहरप्रमुख सुनिल मोदी यांचा राजीनामा
कोल्हापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, कोल्हापूर शहर प्रमुख सुनिल मोदी यांनी पदाचा राजीनामा
शिवसेना शहरप्रमुख सुनिल मोदी


कोल्हापूर, 16 जानेवारी (हिं.स.)।

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट

पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, कोल्हापूर शहर प्रमुख सुनिल मोदी यांनी पदाचा राजीनामा दिला.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसला. वारंवार वरिष्ठांना याची कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही.

असे राजीनामा पत्रकात म्हणत सुनिल मोदी यांनी पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला. असल्याचे म्हंटले आहे.

विशेषतः काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, ते उल्लेखनीय असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा, राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे हे शिवसेनेच्या संस्कृतीला साजेसे आहे, या भावनेतूनच हा राजीनामा देत आहे.

मात्र याचा अर्थ पक्षाशी निष्ठा कमी होणे असा नसून, यापुढेही मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहून, कोणतेही पद न स्वीकारता, एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहीन. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande