सोलापुरात मनसे नेत्याची हत्या झालेल्या प्रभागात भाजपा उमेदवाराने तुरुंगातून जिंकली निवडणूक
सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचे निकाल हाती आले असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग २ कडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण, मनसेचे (MNS) युवा नेते बाळासाहेब सरवद
सोलापुरात मनसे नेत्याची हत्या झालेल्या प्रभागात भाजपा उमेदवाराने तुरुंगातून जिंकली निवडणूक


सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)।

राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचे निकाल हाती आले असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग २ कडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण, मनसेचे (MNS) युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील प्रभागात भाजपकडून शालन शिंदे उमेदवार होत्या, येथील प्रभागात भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग २ मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून किरण देशमुख यांनी तब्बल ११ हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रभाग २ मध्ये सर्वांचे लक्ष लागले होते. येथून किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेनेचे गणेश कुलकर्णी यांच्यात थेट लढत होती. विशेष म्हणजे याच प्रभागातील प्रभाग २ क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत असून येथील प्रभागातच मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, प्रभाग २ मधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते सोलापुरातील प्रभाग २ मध्ये भाजपचे ४ ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथे हत्याप्रकरणाचा कुठलाही भावनिक परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande