
सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)।
सोलापुरात भारतीय जनता पार्टी अब की बार ७५ पारच्या वाटेने विजयी वाटचाल करत आहे. भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली अतिशय परफेक्ट नियोजन लावलेल्या जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हेच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर 102 जागा लढवल्या दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. शिवसेनेने युतीसाठी बराच प्रयत्न केला परंतु भाजपने प्रतिसाद न देता सोहळाचा नारा दिला. पक्षाने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर दिली होती. गोरे यांनी आपल्या सोबतीला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे, आणि शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना घेतले.
भारतीय जनता पार्टीचे सर्व सूत्रे हे हॉटेल बालाजी सरोवर मधून फिरवली गेली. पालकमंत्र्यांनी अतिशय परफेक्ट नियोजन लावले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा माइल स्टोन ठरली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाचा वचननामा जाहीर झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांची ही सभा लक्षवेधी ठरली. स्वतः पालकमंत्र्यांनी प्रत्येक पदयात्रा तसेच सभांना उपस्थिती लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड