विलास इंगोले यांच्या विजयानंतर माजी मंत्री यशोमती ठाकुर यांचे औक्षण; अभिनंदनाचा वर्षाव
अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विलास इंगोले यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या मा. यशोमती ठाकुर यांनी त्यांचे औक्षण करून अभिनंदन केले. विजयाची अधिकृत घोषणा होताच काँग्र
Former Minister Yashomati Thakur's visit after Vilas Ingole's victory; Congratulations showered


अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.)।

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विलास इंगोले यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या मा. यशोमती ठाकुर यांनी त्यांचे औक्षण करून अभिनंदन केले. विजयाची अधिकृत घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रसंगी यशोमती ठाकुर यांनी विलास इंगोले यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत, हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि काँग्रेसच्या विचारधारेचा असल्याचे सांगितले. “जनतेने विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामाला मत दिले आहे. विलास इंगोले हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील,” असे त्या म्हणाल्या.विलास इंगोले यांनीही यावेळी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले. या विजयामुळे अमरावतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून, आगामी काळात महापालिकेतील भूमिका अधिक सक्षमपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande