
नाशिक, 16 जानेवारी (हिं.स.) - नाशिक महापालिकेचे मैदान अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मारले असून एकुण जागांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. जवळपास ६४ जागांवर भाजपने बाजी मारली असून पुढील पाच वर्षांसाठी भाजपचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशकात आता शत प्रतिशत भाजपच असून संपूर्ण शहरावर एकहाती वर्चस्व निर्माण करण्यात यश आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मसाठी उडालेला गोंधळ, तपोेवनातील वृक्षतोडीला दिलेली अवास्तव हवा, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आलेले अति महत्व, राज आणि उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलेले बिनबुडाचे आरोप, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर पातळी सोडून झालेले आरोप, आमदार देवयांनी फरांदे यांची उघड नाराजी या मुद्द्यांवर प्रचारात उभा करण्यात आलेला आरोपांचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला असून नाशिककरांनी विकासाची गती वाढविण्यासाठी पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात महापालिकेच्या चाव्या सोपवल्या आहेत.
नाशिकमध्ये ’१०० प्लस’चा भाजपकडून नारा देण्यात आला होता. तर मतदान आटोपताच ८० प्लस जागा निवडूण येणाच्या आशावाद भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केला होता. तो आता सत्यात उतरला असून आता तीन आमदारांच्या जोडीला महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्तापित होणार असल्याने अनेक अडचणींनी घेरलेल्या नाशिकचा रथ आता विकासाचा मार्गावर येणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याचप्रमाणे आगामी काळात होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करणार आहे त्यामुळे अनेक ही कुंभमेळ्याची कामे अडकून पडलेली होती ती या निमित्याने पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी प्रशासकीय अडचणींना नागरिकांची नाराजी आणि इतर बाबींच्या सामना करावा लागत होता पण लोकप्रतिनिधींची कारकीर्द शहरांमध्ये सुरू झाल्यानंतर संस्थाच्या कामांना देखील वेग येईल यावर मात्र आता कोणतीही शंका नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी