भंडारा - शिक्षकांची कमतरता असल्याने पालकांनी शाळेला ठोकले कुलूप
भंडारा, 17 जानेवारी (हिं.स.)। P भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहगाव येथे जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळा आहे. या शाळेत 82 पटसंख्या असून 3 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणून पालकांनी वारंवार शिक्षण विभागाला निवेदन दिले पण अजून पर्यंत एक शिक्षक अ
भंडारा - शिक्षकांची कमतरता असल्याने पालकांनी शाळेला ठोकले कुलूप


भंडारा, 17 जानेवारी (हिं.स.)।

P भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहगाव येथे जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळा आहे. या शाळेत 82 पटसंख्या असून 3 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणून पालकांनी वारंवार शिक्षण विभागाला निवेदन दिले पण अजून पर्यंत एक शिक्षक अतिरिक्त देण्यात आले नाही. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून पालकांनी शाळेला कुलूप ठोकत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. जो पर्यंत शिक्षक दिला जात नाही तो पर्यंत विद्यार्थी शाळेत पाठविणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande