
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल अधिकृतपणे वाजला आहे. उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर भराडी सर्कल, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील विविध गावांमधून सुमारे ५०० नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकीसाठी एकजुटीने, संघटितपणे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरायचे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गावपातळीवरील विकास, लोकांच्या प्रश्नांसाठी आणि मजबूत लोकशाहीसाठी आगामी लढत निर्णायक ठरणार असून, ही लढाई जनतेच्या विश्वासावर जिंकण्याचा संकल्प करण्यात आला. अशी माहिती भाजप नेते दानवे यांनी दिली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis