दिल्लीत दाट धुक्यामुळे हवाई आणि रेल्वे सेवेवर परिणाम
नवी दिल्ली, १७ जानेवारी (हिं.स.) शनिवारी सकाळी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या मोठ्या भागात दाट धुक्याचे सावट पसरले होते. ज्यामुळे उत्तर भारतात सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय
दिल्लीत दाट धुक्यामुळे विमान उड्डाणे उशिरा


नवी दिल्ली, १७ जानेवारी (हिं.स.) शनिवारी सकाळी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या मोठ्या भागात दाट धुक्याचे सावट पसरले होते. ज्यामुळे उत्तर भारतात सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर दृश्यमानता कमी असल्याने अनेक उड्डाणे उशिराने झाली. धुक्यामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे एकूण १७७ गाड्या उशिराने धावत आहेत.

दिल्ली विमानतळाने आज सकाळी उड्डाणांच्या विलंबाबाबत एक सूचना जारी केली आहे. प्रवाशांना निघण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानांची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण धुक्यामुळे कधीकधी कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

रेल्वेच्या अनेक गाड्या दोन ते आठ तास उशिराने धावत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये कमी दृश्यमानतेमुळे दिल्लीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रमुख गाड्यांवर परिणाम झाला आहे. प्रयागराज, लखनऊ, कानपूर, गाझियाबाद, मेरठ, आग्रा आणि झाशी विभागातील गाड्यांना लक्षणीय विलंब झाला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, धुक्यामुळे सिग्नलिंग आणि ठिकाणाची दृश्यमानता प्रभावित झाल्यामुळे गाड्या नियंत्रित वेगाने धावत आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) थंडीची लाट आणि दाट धुक्यासाठी पिवळा इशारा जारी केला आहे. पण IMD ने किमान तापमानात थोडीशी सुधारणा नोंदवली आहे. १६ जानेवारी रोजी तापमान ४°C होते आणि १७ जानेवारी रोजी सकाळी ७°C पर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, दिल्लीची हवेची गुणवत्ता ही एक मोठी चिंताजनक बाब आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३६८ होता. तो अत्यंत खराब श्रेणीत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande