भाजपाने कागदावरची शिवसेना संपवली, पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत – उद्धव ठाकरे
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. महापौर आपलाच व्हायला पाहिजे हे स्वप्न असल्याचे सांगत, दे
Uddhav Thackeray


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. महापौर आपलाच व्हायला पाहिजे हे स्वप्न असल्याचे सांगत, देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे सूचक विधान त्यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. त्यांना वाटते की कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, कारण ते जमिनीवर राहू शकत नाहीत, असा खणखणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यांनी सांगितले की साम, दाम, दंड, भेद आणि यंत्रणेचा दुरुपयोग करून सगळे काही केले गेले, गद्दार निघून गेले, पण ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. शेवटी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करत जबाबदारी आता अधिक वाढल्याचेही नमूद केले.

गद्दारी करून मिळवलेला विजय मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की या पापाला मराठी माणूस कधीही क्षमा करणार नाही. मात्र, निष्ठेसाठी आणि अभिमानाने लढलेल्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ठाकरे म्हणाले की, प्रचारादरम्यान आम्ही कोणत्याही सोयी-सुविधा देऊ शकलो नाही. आमच्याकडे तन-मन आहे, त्यांच्याकडे फक्त धन आहे. तरीही शक्तीच्या बळावर आम्ही त्यांना घाम फोडला आहे. ही शक्ती अशीच एकत्र ठेवा, पुढच्या पिढी लाही तुमचा अभिमान वाटेल, असे आवाहन त्यांनी केले. हे सर्व यश पूर्णपणे तुमचं आहे. विजयाचे श्रेय तुम्हालाच आहे, असे सांगत त्यांनी ही लढाई संपलेली नसून जिद्द महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. ही जिद्द कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि त्याच जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande