सायकलिंग स्पर्धेसाठी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)।पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात ''पुणे ग्रँड चॅलेंज टूर'' या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले असून वाहतूक वळवण्यात आलीय. वाहतूक पो
सायकलिंग स्पर्धेसाठी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी


पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)।पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले असून वाहतूक वळवण्यात आलीय. वाहतूक पोलिसांनी पर्यायी रस्त्यांची माहिती दिलीय.पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, १९ ते २४ जानेवारी या काळात सायकलिंग स्पर्धा होणार आहे. विशेषतः सोमवारी प्रोलॉग रेस असल्याने वाहतुकीमध्ये मोठे बदल केलेले आहेत. स्पर्धक ६० ते ७० किलोमीटर वेगाने प्रवास करतील, त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय केले जाणार आहेत.पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, या स्पर्धेमुळे जिल्हाधिकारी हे सुट्टी जाहीर करतील. आम्हीही पीएमसीच्या ९ वॉर्डांतील शाळा, महाविद्यालयांना याबाबत कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवाजीनगर परिसरात वाहणं नेणं टाळावं किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेते प्रवास करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande